बाई जोपर्यंत लज्जा, संकोच न् त्यागाची सहनशील वस्त्रं उतरवत नाही, तोवर तिचं भोगणं, तिचं दुःख हे दुर्लक्षित किंवा गृहीत धरलं जातं...न् स्त्रीचं दुःख गृहीत धरलं जाणं हे ज्या समाजाला मान्य असतं, तो समाज तिला कौतुक, सहानुभूती किंवा वाटोळं या तीन गोष्टींशिवाय दसरं काहीही देऊ शकत नाही. समाजाला ते बळी जाणं अंगवळणी पडतं; सवयीचं होतं. माझ्या व्यक्तिगत आयुष्याची चामडी सोलून काढली पूर्णत: न काही जण त्याला वातड म्हणाले, तरीही हरकत नाही. एक वेगळं अनुभवविश्व जगलेलं माझं आयुष्य या घडीला समोर येणं आवश्यक वाटतं मला-माझ्या दृष्टीन...स्वत:च्या आयुष्याला सामोरं जाणं यापेक्षा चारचौघांसमक्ष त्याचं निखळ नग्र रूप पाहण जास्त कठीण आणि दाहक असतं. आत्मचरित्र आजवर कित्येकांनी लिहिलंय..पण आत्मचरित्र लिहिलं म्हणजे खरंच माणूस मांडून होतो का? कुठलीही महत्त्वाची व्यक्ती नसलेली मी केवळ स्त्री म्हणून माझ्या आयुष्याच्या संगळ्व्या खिडक्या- दारं उघडायचं ठरवलं! हे एक मूर्ख धाडस म्हणा किंवा काहीही म्हणा... शेवटी लिहिणं-सांगणं...या गोष्टी काही वेळा इतक्या अपरिहार्यपणे, अटळपणे घडत जात असतात, कीसमोर प्रेक्षक-वाचकवर्ग असला काय, नसला काय, त्या आपल्या बोलत असतात. मला एक स्त्री म्हणून या पुरुषप्रधान संस्कृतीकडे न्यायमागायचाय , माझ्यापुढे माझी भूमिका स्पष्ट आहे.
© 2023 Storyside IN (Audiobook): 9789356041158
Release date
Audiobook: 16 September 2023

Step into an infinite world of stories
Overall rating based on 46 ratings
Thought-provoking
Sad
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 46
Mrs Priti Sangam Lad
24 Sept 2023
Pahila mhanje Mulichya dokyavarche bapache chatra haravle ki tila sakha bhau pan vicharat nahi.ashya muli mrugjalala bhultat aani aayushyachi rakhrangoli karun ghetat..aani lagna karnya aadhi sagli paristhiti swatachya dolyani baghitleli asun pan ji tya aagit udi marayla tayar hote ,evdhe aandhle prem koni karat nahi...Arthat ,tya kalat baryach mulini communist mansabarobar lagna kelit..pan tyanchya pan vatyala garibi ,kasht aani mehnat aali.navre bhashne det firat rahayche...aani bayka nokri karun sansar aani mule sambhalaychya...Mallika bai jara jast daldalit khechlya gelya..Prerna ni husharini changla sauskari mulga baghun lagna kele..Mallika bai sarkhya samajat ashya kiti tari muli aahet jyani premat andhale houn aayushyachi rakh rangoli keley..Mallika bai ektya nahit..fakt tyani khare bolnyache sahas dakhavle...
Prashant
30 Sept 2023
सुरेख अभिवाचन ...shocking पुस्तक आहे ..कवी माणूस असा सुद्धा असू शकतो ?
Sunita
26 Sept 2023
लेखिकेने खूप प्रामाणिकपणे आणि हिमतीने आत्मकथन लिहिलंय याचं कौतुक वाटतंय. अनुपमाने खूप मनापासून वाचन केल्यामुळे अखंड श्रवण होऊन दोन दिवसांत पुस्तक संपवलं. लेखिकेच्या सामर्थ्याची दाद द्यावी तितकी कमीच आहे. प्रसिद्ध व्यक्तीमत्वाचे वैयक्तिक आयुष्य असेही असु शकते याची खात्री पटली या पुस्तकामुळे. धन्यवाद स्टोरी टेल.
Surabaya
3 Oct 2023
<hR>C<hr>sdNice 🚩 🚩 ? <>hr>? 🕶
Bharat
3 Oct 2023
कुठलाही आडपडदा न ठेवता सांगितलेली चित्तरकथा अन् तेवढंच प्रभावी वाचन!
Damodar
30 Sept 2023
अतिशय सुंदर लेखन 🙏वाचन तर अप्रतिम 🙏 अनुपमा ताई अतिशय उत्कृष्ट वाचन 🙏खुप खुप छान 🙏
Anuradha
31 Oct 2023
परिस्थिती किती भयानक असू शकते हे ऐकताना अंगावर काटा आला
Ashok
17 Jan 2024
Very good
Sandeep
5 Dec 2023
Must read
Jyoti
29 Sept 2023
स्री किती सहनशील असते......
English
India